मुंबई- भाजपचे धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी राजीनामा मागे घेतला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आपण राजीनामा मागे घेत आहोत असे स्पष्टीकरण गोटे यांनी दिले.
पक्षात योग्य तो सन्मान मिळत नसल्याने आणि मनपा निवडणुकीच्या प्रक्रियेतून जाणीवपूर्वक दूर ठेवले जात असल्यामुळे गोटे यांनी राजीनामा देणार
असल्याची धमकी दिली होती. याबाबत राज्यातील सर्व आमदारांना त्यांनी पत्र देखील लिहीले होते. गोटेंच्या या निर्णयामुळे
राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
मात्र मुख्यमंत्र्यांनी आपल्या मागण्या मान्य केल्यामुळे आपण राजीनामा मागे
घेत आहोत असे गोटे म्हणाले.
















